
खेड —मुंबई गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू
खेड —मुंबई गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथील जाधव पेट्रोल पंपासमोर भरधाव आयशर टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात विठोबा पांडुरंग साळुंखे (38, रा. शिरवली–सुतारवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी आयशर टेम्पोचालक राजेश विजय मुकनाक (39, रा. उधळे खुर्द,मधलीवाडी याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




