
कर्नल व श्रीमती वायपी चड्डा एज्युकेशन स्कॉलरशिप३० एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज करावेत.
रत्नागिरी, दि. 13 ) : सेवानिवृत्त मेजर अशिष चड्ढा यांनी आपल्या मातापित्यांच्या स्मरणार्थ “कर्नल व श्रीमती वायपी चड्डा एज्युकेशन स्कॉलरशिप” सन २०२६ पासून सुरू करण्याची घोषणा केली असून, जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज दिनांक ३० एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक : ०२३५२-२२२२७१) येथे संपर्क साधावा.
दरवर्षी फक्त चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. ही शिष्यवृत्ती फक्त आर्टिलरी रेजिमेंट मधुन सेवानिवृत्तीनंतर निधन झालेल्या सरदार व अन्य रैंक यांच्या पाल्यासाठी लागू आहे. आर्टिलरी रेजिमेंटमधील रत्नागिरीतील माजी सैनिकांच्या वारसांसाठी नवीन शैक्षणिक शिष्यवृत्ती पात्रतेसाठी विद्यार्थ्याने १० वीत ८० % गुण, तसेच Allen, Aakash, FIITJEE, Resonance आदी नामांकित संस्थांमध्ये JEE/NEET कोचिंगसाठी प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
000




