औषधांच्या दुकानात आता प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप नाही.


कफ सिरपच्या (खोकल्याचे औषध) गैरवापराने लहान मुलांचे झालेले मृत्यू आणि तरूणांमध्ये वाढलेले व्यसन या गंभीर घटनांची दखल घेत केंद्र सरकारने या औषधांच्या विक्रीवर अत्यंत कडक निर्बंध घातले आहेत. यापुढे मेडिकल दुकानांना अनेक प्रकारची खोकल्याची औषधे डॉक्टरांच्या वैध वैद्यकीय चिठ्ठीशिवाय विकता येणार नाहीत.
या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. काही कफ सिरपच्या गैरवापरामुळे देशातील आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय अनेक तरूण या सिरपचा उपयोग नशेसाठी (व्यसनासाठी) करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने औषधांच्या गैरवापरावर अंकुश ठेवण्यासाठी हा महत्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे.
मेडिकल दुकानांत खोकल्याची औषधे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठीही असलेली आता (डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय) विकण्यासस सक्त मनाई आहे. औषध विक्रेत्यांना प्रत्येक प्रिस्क्रिमशनची नोंद ठेवावी लागणार आहे. यामुळे सिरप कोणाला आणि कधी विकले गेले याचा तपशील उपलब्ध राहील.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button