
शकील गवाणकर,जमीर खलफे कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

संपूर्ण कोकणात उत्कंठा लागलेल्या आणि सर्वांचे लक्ष वेधलेल्या स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा कोकणरत्न पदवी पुरस्कार कोंकणातील विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गेली आठ वर्षे सतत सामाजिक कार्य करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर आणि रत्नागिरी जिल्हा समिती चे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांना मान्यवरांच्या हस्ते कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .हा सोहळा शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, संपादक सचिन कळझुनकर उपस्थित होते.तसेच संस्थेचे पदाधिकारी धनंजय कुवसेकर, मुंबई, राजेंद्र सुर्वे खजिनदार, सुभाष राणे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.मुंबई, ठाणे,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सोहळ्याला उपस्थित होते.शकील गवाणकर आणि जमीर खलफे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद , रत्नागिरी,आश्रय जेष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी, सोशल वेल्फर सोसायटी सैतवडे या संस्थांचे पदाधिकारी, सभासद यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




