
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) मध्ये भरती19 डिसेंबरपर्यत अर्ज करा.
रत्नागिरी, दि.13 ) : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) मध्ये भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्थापक, एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ, नंबरिंग मशीन ऑपरेटर सह बायंडर, लिपिक पदावर करार पध्दतीने नेमणूकीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत 19 डिसेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मेस्को ईमेल आय डी : contact@mescoltd.co.in व मेस्को वेबसाईट : www.mescoltd.co.in संपर्क करुन वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. ०२०-२६३०२६५९ वर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.
मेस्को मुख्यालय देयक शाखा – 1, मेस्को क्षेत्रीय कार्यालय, अमरावती – 1, मेस्को क्षेत्रीय कार्यालय, बुलढाणा – 1 येथे व्यवस्थापक या पदासाठी एकूण 3 पदे, कारगिल ऑफसेट प्रिंटिंग प्रेस, सातारा येथे एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी 1 पद, कारगिल ऑफसेट प्रिंटिंग प्रेस, सातारा या ठिकाणी नंबरिंग मशीन ऑपरेटर सह बायंडर हे 1 पद आणि मेस्को क्षेत्रीय कार्यालय, पुणे-2 , मेस्को क्षेत्रीय कार्यालय,मुंबई येथे 3 पदे रिक्त आहे.
000




