भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प निधीच्या तांत्रिक तिढ्यात अडकला.


रत्नागिरी शहरवासियासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शहराला नैसर्गिक आपत्तींपासन सुरक्षितता देणारा भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प प्रशासकीय निधीच्या तांत्रिक तिढ्यात अडकला आहे महावितरण आणि नगर परिषद यांच्यातील आर्थिक वादामुळे हा प्रकल्प रखडल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील वीज वितरण प्रणाली सुरक्षित करण्यासाठी महावितरणने सुरुवातीला १० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित केला होता मात्र, नगर परिषदेने या कामाचा तपशील आणि आवश्यक खर्च तपासल्यानंतर तब्बल १५ कोटी ९९ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक महावितरणकडे सादर केल्याने तांत्रिक तिढा वाढला आहे.
शहरातील वीज वितरण प्रणाली सुरक्षित करण्यासाठी या प्रकल्पासाठी जवळपास ६० टक्क्यांहून अधिक रकमेची ही मोठी तफावत प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा ठरत आहे. महावितरणने अद्याप या वाढीव निधीला मंजुरी दिलेली नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button