
निलेश महादेव आखाडे. भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य “ढोल वादन स्पर्धा” 22 जानेवारी रोजी ‘ विश्वनगर ‘ येथे होणार संपन्न..
रत्नागिरी : प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी निलेश आखाडे आयोजित भव्य ढोल वादन स्पर्धा २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजता विश्वनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. माघी गणेशोत्सव निमित्त पहिल्याच दिवशी ही ढोल वादन स्पर्धा घेतली जाते. यानंतर संपूर्ण माघी गणेशोत्सव ढोल वादन स्पर्धांना या स्पर्धेपासून सुरुवात होते म्हणून या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. तालुक्यातील अनेक ढोल वादन संघ यामध्ये सहभागी होतात.
यावर्षी देखील २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजता विश्वनगर येथे भारतीय जनता पार्टी निलेश आखाडे आयोजित ही स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट ताशा वादक, उत्कृष्ट वेशभूषा संघ, यांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संघाने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे निलेश महादेव आखाडे यांनी केले आहे.



