
चिपळूण पालिकेच्या नवीन इमारतीसाठी तीस कोटींचा निधी मिळावा, आ. शेखर निकम यांची मागणी
मोडकळीस आलेल्या चिपळूण नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी ३० कोटींचा निधी मिळावा, लाल-निळी पूररेषा रद्द करावी, अशी मागणी करत आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रलंबित विकास कामांच्या मुद्यांनाही हात घातला. आ. निकम यांच्या अभ्यासपूर्ण मुद्यांबाबत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
आ. शेखर निकम यांनी पहिल्या टर्ममध्ये अधिवेशनात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील प्रलंबित विकास कामांसाठी आवाज उठवित निधी मिळविला. तर आता दुसर्या टर्नमध्येदेखिल उर्वरित प्रश्नांसाठी आवाज उठविण्यास सुरुवात केली
आहे. आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आ. शेखर निकम यांनी आपले म्हणणे मांडताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी वेगाने विकसित होत असलेले १५० वर्षांचा गौरवशाली इतिहास जपणारे म्हणून चिपळूण शहराची ओळख आहे. ब्रिटिशकालीन चिपळूण नगर परिषदेच्या इमारतीची दुरवस्था झाली असल्याने नव्या इमारतीसाठी ३० कोटींच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी या वेळी केली. चिपळूण दौर्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी या इमारतीच्या निधीच्या मंजुरीचे आश्वासन दिलेआहे. त्यामुळे हा प्रस्ताव लवकर मंजूर होणे हे शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आ. निकम यांनी यावेळी नमूद केले.www.konkantoday.com




