
उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे भगवतीनगर सरपंचपदी पुन्हा प्रगती भोसले.
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेनजीकच्या भगवतीनगर सरपंचपदाचा कार्यभार पुन्हा तत्कालीन सरपंच प्रगती प्रमोद भोसले यांच्या हाती पुन्हा सुपूर्द करण्यात आला आहे. कोकण आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे केलेल्या अपिलात पहिल्याच तारखेला कोकण आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती आदेश मिळाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंचपदाचा कार्यभार पुन्हा भोसले यांच्याकडे सुपूद केला.
सरपंचपदाच्या कामात कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत कोकण आयुक्तांनी भोसले यांना पदावरून काढून टाकले होते. त्यानंतर सरपंचपदाचा कार्यभार उपसरपंच श्रेया श्रीकांत राजवाडकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र कोकण आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे अपील करण्यात आले होते. सर्किट बेंचने कोकण आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली.www.konkantoday.com



