आयुष्यमान भारत आणि म. ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेखाली उपचार आता कॅशलेस होणार


राज्यातील आरोग्यसेवा अधिक सर्वसमावेशक आणि सुलभकरण्याच्यों हिंशेने सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून नागरिकांना अधिक व्यापक लाभ देण्याचा निर्णय पेण्यात आला असून, यामुळे आजारांची संख्या १,३५६ वरून, थेट २,३९९ इतकी वाढली आहे जानेवारी २०२६ पासून नागरिकांना या संयुक्त योजनेतर्गत सर्व उपचार कॅशलेस पद्धतीने मिळणार आहेत. समव्रत योजनेमुळे उपचारांच्या श्रेणी एध्ये मोठी वाढ झाली आहे. शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधे, प्रत्यारोपण साहित्य, जेवण, प्रकरणांमध्ये रुग्णालयाचे अंगीकरण रद्द करण्यात येईल, असा इशाराही प्रवास खर्चया सर्व सेवा पूर्णपणे कॅशलेस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, कोणतेही शुल्क आकारणे किंवा उपचार नाकारणे आढळल्यास संबंधित रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, गंभीर देण्यात आला आहे.
आरोग्यसेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी एनएबीएच किंवा एनक्यूएएस प्रमाणित रुग्णालयांना प्रत्येक उपचारामागे १० ते १५ टक्के अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचे धोरण राजविण्यात आले आहे. योजनेची माहिती मूलभ करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात योजना कक्ष अनिवार्य करण्यात आले आहेत. येथे तैनात ’आरोग्यमित्र’ नागरिकांना अर्ज लाभ, उपचार प्रक्रिया आणि कशार नोंदणी याबाबत गर्गदर्शन करतील.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button