
संगमेश्वर-रत्नागिरी एस. टी अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांच्यात संताप
संगमेश्वर येथे रत्नागिरीकडे जाणारी सकाळची सहा वाजताची एस्.टी बस गेल्या सहा-सात दिवसांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एस्.टी बंद करण्यापूर्वी संगमेश्वर आगारात एकही सूचना फलक, किंवा अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. या निष्काळजी कारभारावर आता प्रश्नचिन्ह उभे राहत असून विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.
www.konkantoday.com




