
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे परिसरामध्ये अवैध वाळू उपसा, तिघांवर गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मंडळ अधिकारी सागर अनंत करंबेळे (वय ४२, रा. देवरुख) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सुरज उदय नलावडे (रा. करजुवे) याने कापशी नदीतून बेकायदेशीररीत्या सुमारे २५ ब्रास, किंमत अंदाजे २.५० लाख रुपये किंमतीची वाळू उपसून ठेवली होती. शकील अहमद (वय २४, रा. उत्तर प्रदेश) व राजकुमार प्रजापती (रा. चिपळूण) हे दोघेही घटनास्थळी येऊन एकमेकांच्या संगनमताने वाळूचे लोडिंग व वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ३२,५०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये २५ ब्रास वाळू २,५०,००० जेसीबी २० लाख, डंपर १० लाख यांचा समावेश आहे. माखजन पोलीस दुरक्षेत्रात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई मपोहेकॉ के. आर. सावंत यांनी केली असून पुढील तपास पोउनि व्ही. डी साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
www.konkantoday.com




