मग सरकार विरोधीपक्ष नेतेपद देण्यास का घाबरतंय-उद्धव ठाकरे


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत अध्यक्षांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सरकारवर शरसंधान केलं. मागील वर्षी आम्ही विरोधीपक्षनेते पदाबाबत चर्चा केली असून त्यासाठी भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आलं होतं मात्र त्यावर काही उत्तर आलं नाही. त्याबाबत कायदा आहे का नाही, असेल ही किंवा नसेनही, पण जे असंवैधानिक असलेलं उपमुख्यमंत्री पद मात्र दोन-दोन आहेत.मग सरकार विरोधीपक्ष नेतेपद देण्यास का घाबरतंय. इतकं मजबूत सरकार असताना ते कोणाला घाबरत आहेत? दोनशेच्या वरती जागा निवडणून आल्या आहेत. केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद राज्य सरकारवर आहे, तरीही सरकार विरोधीपक्षनेते पद देण्यास घाबरत आहेत.जर तुम्ही विरोधी पक्षनेत्यासाठी नियम लावत असाल तर असंवैधानिक असलेल्या उपमुख्यमंत्री पददेखील रद्द करा. त्यांच्याकडे जे पद खाते असतील त्यावरून त्यांना ओळखा,अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. उपमुख्यमंत्री पदाला काही महत्व नसतं. एक नंबर महत्त्वचं असतं, तर दोन आणि तीन नंबरला काही महत्त्व नसतं. विरोधी नेतेपदला लोकसभेत महत्त्व आहे, ते दिलं गेलं पाहिजे.शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची घोषणा केली होती. त्या मदतीच्या पॅकेजचं काय झालं. त्याचे ठिबक सिंचन झाले का असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावलाय. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा झाली असून त्यांना एक रुपये आणि दोन रुपयांचा विमा देण्यात आला. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं. अनेक ठिकाणी पिके सडून गेली. विद्यार्थ्यांची पुस्तके वाहून गेली. काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भलं मोठं पॅकेज जाहीर केलं. मात्र त्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालंय असा टोला उद्धध ठाकरेंनी लगावला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button