
मंडणगड नारगोली टेकडी घाटात एस टी बसला अपघात
मंडणगड तालुक्यातील नारगोली टेकडी घाटात रात्री दोन वाजता एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
ही बस वाकडा आंजर्ले परळ पालवणी मार्गे अशी मार्गस्थ झाली होती.
बसचे चालक विनोद सोनवणे हे नव्यानेच महामंडळात रुजू झाले असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
या अपघातात एसटीचे ब्रेक निकामी झाल्याने बस रस्ता सोडून खाली झाडी झुडपात अडकून पडली. या अपघातात जखमी झालेल्या बस चालक व वाहक यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले




