
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी भाजप प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या पदाधिकाऱ्यांची रामगिरी बंगला (मुख्यमंत्री निवास), नागपूर येथे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सदिच्छा भेट झाली. तसेच या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण यांच्याही विशेष मार्गदर्शनाची आणि सदिच्छांची भेट घेण्याचा मान लाभला.
रत्नागिरी शहरातील संघटनेच्या विविध उपक्रमांबद्दल या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. रत्नागिरीतील जनतेसाठी चालू असलेल्या विकासकामांची माहिती देत आगामी काळातील नियोजनाबाबत मार्गदर्शनही घेण्यात आले. शहर संघटनेच्या कार्याची प्रशंसा करत राज्य नेतृत्वाने रत्नागिरीतील संघटनबांधणी अधिक बळकट करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.
या सदिच्छा भेटीवेळी भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम प्रभाकर ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली खालील पदाधिकारी उपस्थित होते संदीप प्रभाकर सुर्वे शहर सरचिटणीस
मंदार दिलीप भोळे कामगार मो. शहराध्यक्ष
मनोर श्रीकृष्ण दळी संतोष बळवंत सावंत
प्रसाद विजय बाष्ठे प्रविण प्रभाकर ढेकणे
सिद्धेश दत्ताराम नाईक विजय आनंद माळवदे
या सर्व मान्यवरांनी रत्नागिरीतील संघटनेचे कार्य आणि विकासात्मक मागण्यांबाबत नेतृत्वाशी संवाद साधला. या भेटीमुळे रत्नागिरी शहर संघटनेस नवीन उर्जा प्रेरणा आणि दिशादर्शन मिळाल्याचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी सांगितले.
भाजप रत्नागिरी शहर संघटनेच्या पुढील प्रवासासाठी ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून नेतृत्वाच्या आशिर्वादाने रत्नागिरीमध्ये अधिक वेगाने विकास आणि संघटनवृद्धी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.




