
धामणदेवी ग्रा. पं. मध्ये गैरव्यवहार झाल्याचा ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांचा आरोप
खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीत वस्तू खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांनी केला आहे. ग्रामस्थांनी रितसर गटविकास अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पेवेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर यांसह इतर वस्तू पोर्टलवरून खरेदी केल्या. या प्रक्रियेत अनेक गंभीर अनियमितता समोर आली असून ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आली आहे. या संदर्भातील बिलांमध्ये नमूद नसलेल्या वस्तू प्रत्यक्ष खरेदी करण्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय गावातील विकासकामांमध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप केला आहे.
www.konkantoday.com




