
दापोली तालुक्यात भरते बिन भिंतीची शाळा….
दापोली : सध्या धावत्या जगामध्ये निसर्ग संवर्धन हा कळीचा मुद्दा झाला असताना आणि सर्वत्र वृक्ष कटाई आणि प्रदूषणाची स्पर्धा दुर्दैवाने सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मात्र एक नवा आशेचा किरण फुलला आहे. आणि त्यामुळे कोकणच्या आणि दापोलीच्या पर्यटनाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे.
दापोली तालुक्यातील जालगाव येथे निवेदिता प्रतिष्ठान आणि आम्रपाली होम स्टे च्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांकरिता “बिन भिंतीची शाळा” असा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना प्रकल्प प्रमुख डॉ.प्रशांत परांजपे यांनी सांगितलं ,की आज पर्यावरण विषय हा गुणांपुरता दुर्दैवाने मर्यादित राहिल्यामुळे आणि पालकांपर्यंत त्याची जाणीव जागृती न झाल्यामुळे निसर्गाचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास होत चालला आहे. तो टाळून सत्यस्थिती मध्ये निसर्ग रक्षण किती महत्त्वाचे आहे आणि सद्यस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव जागृती करून देण्यासाठी या निसर्ग शाळेचे अर्थात बिन भिंतीच्या शाळेचे आयोजन करण्यात आलं आहे.
या शाळेमध्ये विविध महाविद्यालयाने शाळांचे आजपर्यंत हजारो व




