
दापोलीच्या मच्छीमारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार -मंत्री योगेश कदम यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट
नागपूर ११ : राज्याचे गृहराज्यमंत्री आणि खेड दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांची भेट घेतली. दालनात झालेल्या या बैठकीत दापोली परिसरातील मत्स्यव्यवसायसंबंधित सुविधा, समस्या यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली




