
कै. डॉ. मधुकर लुकतुके यांना कै. कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार जाहीर
कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, कोळथरे यांच्या वतीने देण्यात येणारा कै. कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार यावर्षी दाभोळ येथील गरिबांचे डॉक्टर समजल्या जाणार्या कै. डॉ. मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला असून आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्ये यांचे हस्ते डॉ. लुकतुके यांचे चिरंजीव केदार लुकतुके हा पुरस्कार स्वीकारणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, कोळथरे यांच्यावतीने समाजप्रबोधन, संस्कृत प्रचार, उद्योजकता, आयुर्वेद सेवा आदी विषयात समर्पण भावनेने कार्य करणार्या व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्काराचे स्वरूप
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रुपये २५ हजार असे आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता दाभोळ येथील दत्तमंदिर सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीन पाटणे यांनी पत्रकारांना दिली.
www.konkantoday.com




