
उद्योजक सचिन पाकळे यांच्या उत्पादन युनिटवर ईडीची धाडखेडमध्ये खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सचिन पाकळे यांच्या उत्पादन युनिटवर गुरुवारी सकाळी ईडीच्या पथकाने टाकलेल्या अचानक धाडीनंतर खेड परिसरात मोठी खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
गुरुवारी सकाळी सुमारे आठ वाजता ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह कारखान्यात दाखल झाले. प्रवेशानंतर त्यांनी तात्काळ विविध कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची नोंदी आणि संबंधित दस्तऐवजांची तपासणी सुरू केली. अचानक वाढलेल्या हालचालीमुळे कारखान्याच्या परिसरात उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
उद्योजक सचिन पाकळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रस्थापित नाव असून त्यांचा राजकीय प्रभावही मानला जातो. त्यामुळे या धाडीमुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ माजली असून विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
तत्पूर्वी, पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. या कारवाईनंतर खेड तालुक्यात तसेच जिल्ह्यात या धाडीची व्यापक चर्चा सुरू झाली आहे.




