
राजापुरात निवडणुकीच्या निमित्ताने लक्ष्मी आली दारीचीच जोरदार चर्चा
तब्बल आठ वर्षांनी झालेल्या व चार वर्षे लाबलेल्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाला आठ दिवस उलटलेले असताना व निकालाला अद्याप तेरा दिवसांचा कालावधी उरलेला असताना यंदाच्या निवडणुकीत काहींनी दिवाळीनंतर खरी दिवाळी अनुभवल्याची मोठी चर्चा शहरात सुरू आहे. अशा निवडणुका होणार असतील तर दर सहा महिन्यांनी निवडणुका व्हाव्यात अशीही खुमासदार चर्चा शहराच्या नाक्यानाक्यावर होत असताना दिसत आहे.
यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या लक्ष्मी प्राप्तीच्या चर्चा सर्वत्र होताना दिसत असतानाच यामध्ये अपक्षांनीही आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केल्याचे चर्चिले जात आहे. यंदाची निवडणूक ही काहीअंशी शहराबाहेरील काहींनी तसेच ठेकेदारांनीच हाती घेतल्याचे बोलले जात आहे याचीही गंभीर आणि खुमासदार अशा दोन्ही पध्दतीची चर्चा राजापुरात होत आहे.www.konkantoday.com




