
रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरणाबाबत अजूनही उदासीनता
रत्नागिरी जिल्ह्यात महिला आरोग्यासंदर्भात एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यभरात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात १५ वर्षाखालील मुलींसाठी एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) या लसीचे लसीकरण करण्यात येत आहे. कॅन्सर पैकी गर्भाशयाच्या मुखेच्या कॅन्सरचा (साइकल कॅन्सर) प्रतिबंध करण्यासाठी ही लस अत्यंत महत्वाची आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ७ हजार ८९० मुलींना याचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र लसीसंदर्भात पालकांचे प्रबोधन करण्याची गरज आता समोर येऊ लागलो आहे
रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाने एचपीव्ही ही लस किशोरवयीन मुलींसाठी उपलब्ध केली आहे. जिल्ह्यील सर्व शाळांमधील ९ ते १४ वर्षे या वयोगटातील मुलींना ही लस देण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सध्या सरू आहे ही लस किशोरवयीन मुलींना देण्याआधी पालाकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.www.konkantoday.com




