
प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात योग्य काळजी न घेतल्याने जिल्ह्यात पाच वर्षात ८१६ बालकांचा मृत्यू !
प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात योग्य काळजी न घेतल्याने गत पाच वर्षात जिल्ह्यात ० ते ५ व १ ते ५ वर्ष वयोगटातील ८१६ बालकांचा अकाली मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीवरून समोर आले आहे. यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. कुपोषण, वेळीच योग्य आरोग्य सेवा न मिळणे, लसीकरण न होणे ही त्यांच्या मृत्यूची कारणे आहेत. अनेकवेळा ग्रामीण भागातील मातांची प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतरची आवश्यक काळजी घेतली जात नाही. तर कधी अनेकांना योग्य मार्गदर्शन देखील मिळत नाही. चुकीच्या पद्धतीच्या जीवन शैलीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही माता याकडे गांभीर्याने पाहत हात नसल्याचे आढळून आले आहे.
अपुर्या सुविधा नवजात शिशु अतिदक्षता युनिट्स आणि बालरोग तज्ज्ञांची सेवा जिल्ह्याच्या सर्व भागांत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये सकस आहाराचा अभाव असल्याने बालके कुपोषणाला बळी पडतात, ज्यामुळे त्यांची रागप्रतिकारशक्ती कमी होते. ही संख्या कमी होण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असून अंगणवाडी सेविका, आशा सेविकांमार्फत गरोदर मातांची नोंदणी व त्यांना वेळीच दवाखान्यात जाऊन नोंदणी करून उपचार करण्यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.www.konkantoday.com




