
’तुम्ही आरक्षण दिलं, दारिद्र्यातून बाहेर आलोय’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तरूण-तरूणींकडून आभार
मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात फडणवीस यांनी ८६२ अनाथ मुला-मुलींना राज्य सरकारी नोकर्यांमध्ये दिलेले एक टक्का समांतर आरक्षण आणि मोफत शिक्षणाची सोय, या ऐतिहासिक निर्णयाचा ज्यांच्या जीवनावर थेट परिणाम झाला. त्या तरुण-तरुणींनी ’वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या कार्यक्रमाच्या नियोजनाची धुरा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांनी सांभाळली या सोहळ्यात विनायक विश्वकर्मा या युवकाने फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी एक भावस्पर्शी कवितेच्या ’तुम्ही आरक्षण दिलं, दारिद्र्यातून बाहेर आलोय’ या ओळींनी सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले.
मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, पण आम्ही तुम्हाला ’देवाभाऊच’ म्हणणार! या हृदयस्पर्शी ओळींनी शुक्रवारी ’वर्षा’ निवासस्थानी आयोजित अनाथ तरुण-तरुणीच्या कृतज्ञता सोहळ्याला एक भावनिक किनार मिळाली. कवितेच्या सादरीकरणाने उपस्थित सर्वजण निःशब्द झाले. आपल्या संघर्षातून पुढे आलेल्या या तरुणांच्या कहाण्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणार्या होत्या.
www.konkantoday.com




