
चिपळूण तालुक्यातील पेढे येथील तरूणाचा रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
रेल्वेची धडक बसून चिपळूण तालुक्यातील पेढे येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी वालोपे रेल्वे स्टेशन येथील फरशी तिठा येथील पूल परिसरात घडली.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश शंकर पानकर (३१, पेढे-पानकरवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश याला वंदे भारत या ट्रेनची धडक बसली. यात गंभीररित्या जखमी झालेल्या गणेश पानकर याचा मृत्यू झाला. त्याच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-भाऊ असा परिवार आहे.
www.konkantoday.com




