
राजापूर तालुक्यातील नाटेमध्ये खलाशाचा पाण्यात बुडून मृत्यू
राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात एका मच्छीमार बोटीवर काम करणार्या झारखंड येथील खलाशाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ५ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून ६ डिसेंबर रोजी राजापूर ग्रामीण रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुप्रीयन मिंज (५६, रा. तमडा, थाना सिमडेगा, झारखंड) हा ओमकार रामकृष्ण पेडणेकर यांच्या बोटीवर २ डिसेंबरपासून खलाशी म्हणून कार्यरत होता. त्याच्यासोबत विनय केरकट्टा आणि सिसिर केरकट्टा हे दोन सहकारी काम करत होते. ४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मिंज हा खाडीच्या बाजूला असलेल्या वहाळामध्ये (ओढ्यात) आंघोळीसाठी गेला होता. त्यानंतर रात्री ९.३० वाजता त्याने सहकार्यांसोबत जेवण केले. जेवणानंतर सहकार्यांनी त्याला बोटीच्या केबिनमध्ये झोषण्यासाठी बोलावले असता, तो तिथेच बसून राहिला. दुसर्या दिवशी, ५ डिसेंबर रोजी सकाळी सहकार्यांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी मिंज हा वहाळाच्या पाण्यात उपड्या अवस्थेत आढळून आला.www.konkantoday.com




