
धीरज साठविलकर यांना “आस्था”चा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : येथीलआस्था सोशल फाउंडेशनमार्फत जागतिक दिव्यांग दिनी देण्यात येणाऱ्या दिव्यांग प्रेरणा पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा पुरस्कार हरहुन्नरी कलाकार धीरज राजेंद्र साठविलकर यांना प्रदान करण्यात आला.
पाच हजार रुपये चा धनादेश, शाल, श्रीफळ, व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी विचारपीठावर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते, रत्नागिरी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती बिराजे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, ॲड. श्री. धुरत व आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या सचिव सुरेखा पाथरे उपस्थित होत्या. विशेष म्हणजे धीरजने आपल्या पायाने वैदेही रानडे यांचे चित्र काढून त्यांना ते या प्रसंगी भेट दिले.




