
दापोली तालुक्यातील सारंग बौद्धवाडी येथे तरुणाची आत्महत्या
दापोली तालुक्यातील सारंग बौद्धवाडी येथे ४० वर्षीय रुपेश दामू मोहिते याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ दिवस घरात कोणतीच हालचाल दिसत नसल्यामुळे राहुल बाळाराम मोहिते यांना वसंत गंगाराम मोहिते यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की रुपेश याच्या घरात तीन दिवस विजेचे बल्ब पेटलेल नाहीत. तसेच तो कोठेही दिसला नाही. वसंत मोहिते हे सुनील गमरे यांना घेऊन रुपेशच्या घरी गेले. रुपेशच्या घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडला रुपेशने घराच्या पत्र्याच्या लोखडी अँगलला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. अत्यवस्थ रुपेशला दापोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकीय अधिकार्याने तपासून तो मृत असल्याचे घोषित केले.
ही घटना ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दापोली पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून दोन करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com




