राज्यात मोठी उलथापालथ. २२ आमदार या पक्षात उडी मारणार! आदित्य ठाकरे म्हणाले.!!

नागपूर : राज्यात एका नियमबाह्य बनलेल्या पक्षात दोन गट पडले आहे. त्यापैकी एका गटातील २२ आमदार एका पक्षात उडी मारण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गद्दारी करून एक नियमबाह्य पक्ष बनला. या पक्षाचे आता दोन गट पडले आहे. त्यापैकी २२ जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे सर्व आमदार उठतात आणि बसतात. विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत एक इशाराही दिला होता. हा इशारा कुणाला होता, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. काल मुख्यमंत्र्यांनी इंडिगो विमानावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेला आदित्य ठाकरे उत्तर देत होते. या सरकारचे कोणते मंत्री चार्टर विमानाने येतात. नगर पंचायतच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरने फिरतात. एकनाथ शिंदे बॅगामध्ये कोणता आनंदाचा शिधा वाटतात. विमान कंपन्या केंद्र सरकारचे ऐकत नाही. देशभरात विमान प्रवासाची वाट लागली आहे. हा गंभीर विषय मुख्यमंत्री टोलवत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

सरकारकडून विकासाच्या नावावर विनाश

भाजपचे सरकार नाशिकमध्ये तपोवनात शेकडो वृक्ष, ठाणेतील मनोरुग्णालयात ७०० वृक्ष, नागपूरमध्ये आजनी वन, संजय गांधी उद्यानमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा घाट रचत आहे. तर दुसरीकडे रस्ते व बोगद्यांच्या नावाने सर्रास वृक्ष कापले जात आहे. ताडोबा, मेळघाट, सह्याद्री पसिररातही मायनिंगच्या नावाने वृक्ष कापण्याचा घाट आहे. या सगळ्या प्रकारावरून हे भाजप सरकार विकासाच्या नावावर पर्यावरन उद्धवस्त करायला निघाल्याची टिकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

अधिवेशनाचे सरकारला गांभीर्य नाही

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. शहराची वाट लागत आहे. सरकार एकाही धोरणावर चर्चा करत नाही. सरकार या अधिवेशनबाबत गंभीर नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने बहुमताचे सरकार

राज्यात निवडणूक आयोगाच्या आर्शिर्वादाने आलेले बहुमताचे सरकार आहे. हे सरकार विरोधकांशी चर्चा करायला घाबरते. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद दिले जात नाही. सरकारला विरोधी पक्षाची भिती का वाटते? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button