
क्रॉसिंगला थांबलेल्या रेल्वेमधून महिलांचे दागिने व पर्स चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश, एक आरोपी ताब्यात
गेल्या काही वर्षांपासून कोकण रेल्वे मध्ये प्रवाशांचे दागिने तसेच मौल्यवान वस्तू लांबवण्याचे प्रकार वारंवार घडत होतेप्रवाशी गाढ झोपेत असताना रात्रीच्या वेळी होणाऱ्या या चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते मात्र नव्याने स्थापन झालेल्यारत्नागिरी लोहमार्ग पोलिसांना चोऱ्या करणाऱ्या आरोपीला पकडण्यात मोठे यश आले आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या काळात दाखल झालेल्या आठ चोरीच्या प्रकरणांचा तपास करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर स्वतंत्र लोहमार्ग पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आले आहे. या नव्या युनिटने तात्काळ कामाला सुरुवात करत वाढत्या चोरीच्या घटनांचा तपास हाती घेतला. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रेल्वेत झालेल्या चोरीच्या आठ तक्रारी रत्नागिरी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या.
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्या स्लाइडिंग साठी थांबलेल्या असताना रात्रीच्या वेळेस रेल्वेमध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे. टोळीचा माग घेतला या टोळीतील आरोपीला अहिल्यानगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीला दहा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेमध्ये मुंबई लोहमार्ग पोलीस विभागाच्या हार्बर डिव्हिजनच्या सहाय्यक आयुक्त नीलिमा कुलकर्णी यांनी सदर कारवाईची माहिती दिली.
रात्रीच्या वेळेस रेल्वे गाड्या साईडिंग साठी थांबल्यानंतर ही टोळी अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या करीत असत यासाठी आरोपी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून खिडकी जवळ बसलेल्या विशेषता महिला प्रवाशांचे दागिने ओढून चोरून नेत होते आतापर्यंत आठ गुन्हे दाखल करण्यात आले होते. दिनांक 30 रोजी पोलिसांनी कारवाई करत जवळपास पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालामध्ये 44 ग्रॅम सोने, 3 पर्स त्यामध्ये किरकोळ सामान, आणि मोबाईल असे काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिवाणखवटी ते सापे बामणे या पोलिस ठाण्याच्या दरम्यान या चोरीच्या घटना घडत होत्या. एकूण चार जणांची टोळी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून लवकरच तिन्ही आरोपी पकडले जातील असा विश्वास लोह पोलिसांनी व्यक्त केला आहे
ही कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस हार्बर डिव्हिजनच्या सहाय्यक आयुक्त नीलिमा कुलकर्णी, आरपीएफ रेल्वे पोलीस रत्नागिरी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी, त्यांच्यासह पोलिस हवालदार विकास नलगे, सुनील खोत, जनार्दन पुलेकर, रणजीत रासकर, सुरेश येल्ला, अतुल धायडे, गुन्हे शाखा नेरूळ युनिटने यशस्वीरित्या पार पाडली कोकण रेल्वेने प्रवास करताना काही तांत्रिक कारणामुळे गाड्या स्लाइडिंग ला उभ्या केल्या जातात त्याचा फायदा हे चोरटे घेत होते मात्र कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांनी स्वतःही सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे अशा निर्झर ठिकाणी गाडी थांबल्यास खिडक्यांच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू अगर दागिने बाळगताना काळजी घेणे आवश्यक आहे तसेच अशा बाबतीत काही संशय असल्यास किंवा तक्रार असल्यास लोह मार्ग पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे




