
’रोटरी’च्या स्पंदन धामणेचा राष्ट्रीयस्तरावर गौरव
भोपाळ-मध्यप्रदेश येथे रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनतर्फे आयोजित ५२ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनात भरणे-बाईतवाडीतील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील स्पंदन गौरव धामणे आणि मार्गदर्शक शिक्षिका शर्वरी धामणे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला.
स्पर्धेत स्पंदन धामणे याने सादर केलेला ’घुमर द स्पिन अँड जर्क लॉन्चर’ हा प्रकल्प विशेष आकर्षण ठरला. यंदा प्रथमच या प्रकल्पाच्या पेटंटसाठी परीक्षण करण्यात आले. याचे परीक्षण नवी दिल्ली येथील आयपी पेटंट कार्यालयातील सहाय्यक संचालक नीलेश पाटील यांनी केले. या प्रकल्पातील नाविण्य, कार्यप्रणाली आणि सादरीकरण याचे त्यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रीय स्तरावर ’स्पंदन याने मिळवलेला हा मान केवळ शाळेसाठीच नव्हे तर जिल्ह्याचा गौरव वाढवणारा आहे. संस्था चेअरमन बिपीन पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकार्यांनी दोघांचेही कौतुक केले.
www.konkantoday.com




