रेल्वे कर्मचार्‍यांचा ’ऑन-द-स्पॉट सुरक्षा पुरस्कारा’ने गौरव


आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या ६ महिन्यात विभागांमधील अनेक कर्मचार्‍यांनी संभाव्य धोके ओळखून असुरक्षित परिस्थिती टाळत आपत्कालीन परिस्थितींना त्वरित प्रतिसाद देत दाखवलेल्या सतर्कतेबद्दल कोकण रेल्वेने कर्मचार्‍यांना ’ऑन द स्पॉट सुरक्षा पुरस्कारा’द्वारे सन्मानित केले.
’कोरे’चे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी ’ऑन द स्पॉट कॅश अवार्ड’ उपक्रमाद्वारे सुरक्षितता आणि सतर्कता बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षिततेचे धोके ओळखून प्रतिबंधात्मक कारवाई करणार्‍या कर्मचार्‍यांची तत्परता
ओळखण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार उल्लेखनीय योगदान देणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला.
तुतारी एक्स्प्रेसमधून एका मुलाचे अपहरण करणार्‍या संशयिताच्या ताब्यातून त्याची सुटका करणारे रत्नागिरी स्थानकातील तिकीट तपासणीस संदेश चव्हाण यांना १५ हजार रुपये देऊन गौरवण्यात आले. धावत्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून उतरताना वृद्धाचा जीव वाचवल्याबद्दल आरसीएफचे रणजीत सिंह आणि महेंद्र पाल, वीर सिंह यांना प्रत्येकी ५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. उक्षी-भोके बोगद्यात रेल्वे फ्रॅक्चर वेळेवर आढळल्याने मोठी दुर्घटना टाळल्याबद्दल ट्रॅकमन पी. एल. सावंत यांना १० हजार रुपये देऊन गौरवण्यात आले.
टीएम-आय. व्ही. पी. व्ही. राऊळ यांना सावंतवाडी रोड-झाराप विभागादरम्यान पॉईंट आणि क्रॉसिंग स्टॉक रेल्वेमध्ये फॅक्चर आढळले. यामुळे दुर्घटना टाळल्याबद्दल त्यांना १५ हजार रुपये रोख तर कणकवली स्थानकप्रमुख सुश्री सुविधा स्वामी यांनी सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान रेकच्या लटकलेल्या एफपी पाईपची तक्रार केल्यामुळे त्यांना १ हजार रुपये देऊन गौरवण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button