
राजापूर तालुक्यातील घोडेपोई सडा येथे घराच्या बांधकामावरून वाद, दोघांना मारहाण
राजापूर तालुक्यातील घोडेपोई सडा येथे घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामाबरून झालेल्या किरकोळ वादातून तिघांनी एका व्यक्तीच्या भावाला घरात घुसून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी संतोष गोविंद लेंबरकर (५०, रा. नालासोपारा, मूळ रा. सागवे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश कल्याण बांदिवडेकर, रत्नाकर कल्याण बांदिवडेकर व कल्याण भिवा बांदिवडेकर (तिघे रा. घोडेपोई) यांच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष लेंबरकर यांच्या घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामासाठी वाडीतीलच एकाच्या ट्रकने चिरे आणले होते. याच कारणावरून घोडेपोई येथील राजेश, रत्नाकर व कल्याण बांदिवडेकर यांना राग आला होता. या रागातूनच ३० नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १०.३० च्या सुमारास घोडेपोई सडा येथे संतोष लेंबरकर यांचे भाऊ रवींद्र लेंबरकर यांच्या घरात घसून या तिघांनी शिवीगाळ करत त्यांना दांडक्याने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेला त्यांचा पुतण्या दत्ताराम शाम लेंबरकर यालाही मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com



