
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे दर्शनासाठी आलेल्याचंद्रकांत मधुकर आठवले अपर्यटक गणपतीपुळे येथील हॉटेलवर आजारी पडला त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला सीपीआर कोल्हापुर येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चंद्रकांत मधुकर आठवले (वय ५३, रा. २५ दिव्यज्योती सीएचएस शास्त्रीनगर रोड, नं २ गोरेगाव-मुंबई) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. ही घटना २० नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास सीपीआर कोल्हापूर हॉस्पिटल येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत आठवले हे गणपतीपुळे येथील हॉटेलवर रहात असताना पोटदुखीने आजारी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.




