
बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेची वनविभागाकडून चौकशी
संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडी येथे साक्षी मंगेश पवार या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर तात्काळ वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेची भेट घेऊन सविस्तर चौकशी केली. यानंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. परिसरात बिबट्या फिरत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला असून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पाहणीदरम्यान वनरक्षक कडूकर, वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सुरज तेली, संयोग तेली आदी अधिकारी उपस्थित होते.
वनविभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबवून परिसरात टेहळणी वाढवण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी काळजीपूर्वक वावरावे, एकट्याने जंगल परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सरपंच राजू पवार यांनीही जखमी महिलेची भेट देवून चौकशी केली.
www.konkantoday.com




