
गोगटे महाविद्यालयात ६ रोजी खगोल व्याख्यान, आकाश दर्शन
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्रातर्फे व्याख्यान आणि आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खगोल अभ्यास केंद्रातर्फे ६ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता सारंग ओक यांचे “अवकाशातील आश्चर्ये” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये होणार आहे.
श्री. ओक हे पुणे येथील असीमित संस्थेचे संस्थापक आहेत. ते गेली अनेक वर्षे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून खगोल अभ्यासाचा प्रसार करत आहेत. व्याख्यानानंतर सायंकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत आकाश दर्शनाचा कार्यक्रम ही होणार आहे.
कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी खगोल अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. बाबासाहेव सुतार यांच्याशी संपर्क साधावा. हे व्याख्यान आणि आकाशदर्शन कार्यक्रम रत्नागिरीतील खगोलप्रेमीसाठी खुला असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.




