
गोगटे महाविद्यालयाची विद्यापीठ होण्याकडे वाटचाल !
रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २५ युजी विभाग, १५ पीजी विभाग, ७संशोधन केंद्रे आहेत. मुंबई विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, युजीसीकडून मानांकन नॅक ए ग्रेड, आयएसओ मानांकन हे किताबही प्राप्त आहे. शासनाच्या विविध योजना, देणगीदारांकडून मदत यामुळे महाविद्यालयाची प्रगती अभिनंदनीय आहे. या सर्व उल्लेखनीय गोष्टींमुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यापीठाकडे वाटचाल होत आहे, असे कौतुकोदगार पीएम उषा कोकण विभागाचे समन्वयक डॉ. पांडुरंग बर्कले यांनी केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे पीएम-उषा अंतर्गत बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. ही परिषद हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे झाली. मंचावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या व पीएम उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि परिषदेचे सहनिमंत्रक डॉ. रुपेश सावंतदेसाई, डॉ. अजिंक्य पिलणकर आदी उपस्थित होते.
वाणिज्य व व्यवस्थापन, लेखाशास्त्र व वित्त, आणि अर्थशास्त्र यांवरील जागतिक संवाद परिषदेच्या सांगतेवेळी डॉ. बर्कले यांनी सांगितले, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पीएम- उषा) ५ अंतर्गत ५ कोटीचे अनुदान ४६ महाविद्यालयांना दिले जाते. यात गोगटे महाविद्यालयाचाही समावेश आहे.www.konkantoday.com




