
कशेळी येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

गावखडी : राजापूर तालुक्यातील कशेळी येथे श्री दत्त मंदिरामध्ये प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई कशेळी व स्थानिक भक्तगण यांच्या वतीने दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला .
४ डिसेंबार रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती झाल्यानंतर सप्त देवतांची पूजा, होम हवन, गुरुचरित्र पारायण हे धार्मिक विधी पार पडले.
दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी आनंदाबुवा होळकर यांचे श्रीदत्त जन्मावर कीर्तन झाले. त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यानंतर ओम ध्वनी आरती पालखी प्रदक्षिणा झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई कशेळी यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.




