
जुवे गावात श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन
रत्नागिरी शहरानजीकच्या जुवे गावात श्री देव म्हसोबा (महेश्वर) श्री दत्त मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्या वतीने श्री दत्त मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. २ डिसेंबर पासून या उत्सवाची सुरुवात झाली असून दि ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्तजयंती दिनी सकाळी ९ ते सायं ४.३० दरम्यान श्रीदत्तनाम, सायं ४.३० ते ६ दरम्यान श्रीदत्तजन्मावर आधारित कीर्तन व श्रीदत्तगुरूंचा जन्मसोहळा पार पडणार आहे. यानंतर ६.३० ते ८ दरम्यान श्रीदत्तगुरु पालखीदिंडी आणि रात्री ९.३० वाजता करा ओके मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच गुरुवारी दुपारी १ ते ३ पर्यंत खिचडी प्रसाद असणार आहे.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ११ वाजता शालांत माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदविका परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी १ ते ३ दरम्यान महाप्रसाद आहे.
तरी या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.




