
चिंचखरी फाटकवाडी येथे २ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सव
रत्नागिरी: शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी येथे २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. ०२ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता दत्तयागाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल. बुधवार दि. ०३ डिसेंबर रोजी सकाळी १०:४५ वाजता आरती, सकाळी ११:०० वाजता अखंड नामजपाची सुरुवात होणार आहे. गुरुवार दि. ०४ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता नामजपाची सांगता होईल. दुपारी १२:३० नंतर महाप्रसाद होईल. सायंकाळी ०५ वाजता ह.भ.प. कौस्तुभ फाटक यांचे दत्त जन्माचे किर्तन होईल. सायंकाळी ०६:०० वाजता दत्त जन्म होईल त्यानंतर महाप्रसाद होईल.
शुक्रवार दि. ०५ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता तुळशी व फुले सहस्रनाम पादूकांवर वाहणे, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद होईल. सायंकाळी ०६:०० वाजता श्री सत्यनारायण पुजा, सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद, सायंकाळी ०८:०० ते रात्रौ ९.००वा. श्री सोमेश्वर भजन मंडळ, भडे लांजा यांची भजन सेवा होईल. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन फाटक कुटुंबीयांनी केले आहे.



