
सध्या देशात द्वेषाचं विष पेरलं जातंय -समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा आरोप
देशाच्या फाळणीचा कागद गांधीजींनी फाडून रद्दीच्या टोपलीत टाकला असता तर त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला असता. हिंदु-मुस्लीम फाळणी झाली हे सर्वात वेदनादायी असल्याची खंत व्यक्त करत सध्या देशात द्वेषाचं विष पेरलं जात असल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी चिपळूण येथे केला.
चिपळूण नगर पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सपाच्या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी चिपळूणमध्ये सभा घावली. या वेळी बोलताना ते म्हणाले, सावंतवाडी येथे मुस्लीम समाजाच्या तरुणाला छळ करून मारले. त्याच्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि चार फुटाच्या अर्धवट डोक्याचा मंत्री मशिदीत घुसून मारण्याचा इशारा देतो.
त्यावर सरकार काही बोलत नाही. मुंबईतील सिरियल ब्लास्टमधील आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडल्यावर हुशार मुख्यमंत्र्यांनी तातडीने कोर्टात धाव घेतली, पण मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंग यांचा हस्तक्षेप असताना देखिल पुरावे असून कोर्टाने निर्दोष सोडल्यावर मुख्यमंत्री शांत बसले. देशात हिंदु-मुस्लीम यांच्यात जाणीवपूर्क द्वेष निर्माण केला जात आहे, असा आरोप अबू आझमी यांनी केला.www.konkantoday.com




