
मासिक बिलाचा भरणा होत नसल्याने रत्नागिरी परिमंडळात ३७.५१ कोटींची थकबाकी
रत्नागिरी परिमंडळात ३७.५१ कोटींची थकबाकी वीजबिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडळांतर्गत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख ७२ हजार १८१ ग्राहकांकडे ३७ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीज बिल थकवणार्या रत्नागिरी परिमंडलातील ३ हजार २१ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ७४९ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
१ हजार २७२ ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकित बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणार्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती १ लाख ४९ हजार २२८ ग्राहकांकडे २२ कोटी ९२ लाख, व्यावसायिक १४ हजार ८५२ ग्राहकांकडे ७ कोटी ६२ लाख, औद्योगिक २ हजार १७६ ग्राहकांकडे ३ कोटी ९३ लाख, सार्वजनिक सेवा वर्गवारीतील ५ हजार ५३३ ग्राहकांकडे
२ कोटी ६९ लाख जणि इतर वर्गवारीतील ३९२ ग्राहकांकड ३४ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.www.konkantoday.com




