
बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करा, महसूल विभागाचे आदेश.
केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म व मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. अशा प्रकरणात तातडीने ’पोलीस तक्रार दाखल करण्याचे करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. या निर्णयानुसार ११ ऑगस्ट २०२३ नंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म व मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांबाबतच्या तक्रारींची दखल घेत महसूल विभागाने गुरुवारी याबाबत शासन परिपत्रक काढत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना १६ मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्म-मृत्यू दाखले दिले गेले आहेत ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जातील. आधार कार्ड हा जन्माचा किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा म्हणून ग्रह्य धरता येणार नाही, असे महसूल विभागाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देऊन स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com




