
प्रभाग ६ मधील पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी :
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 निमित्त प्रभाग क्रमांक सहा येथील नगरसेवक पदाचे उमेदवार राजीव कीर व नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेला प्रभागातील मतदार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्रभागातील विविध मार्गांवरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांनी उत्साहाने प्रतिसाद देत उमेदवारांना जोरदार पाठिंबा दर्शविला.
या पदयात्रेत भाजपा–शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहर संयोजक सचिन वहाळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, डॉ. चंद्रशेखर निमकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा सुर्वे, सुदेशजी मयेकर, सौ. ऋता राहूल पंडित, विभाग प्रमुख मनोज साळवी, श्री राजन पटवर्धन, शेखर लेले, श्री नरेंद्र देसाई, सौ. प्राजक्ता रूमडे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती पदयात्रेचे वैशिष्ट्य ठरली.
पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत विकास कामे, भविष्यातील योजना आणि महायुतीच्या विकासदृष्टीचा आढावा देण्यात आला. उमेदवार राजीव कीर व सौ. मेधा कुळकर्णी यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये महायुतीचा विजय निश्चित असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




