
दापोलीचे भूतपूर्व उपविभागीय अधिकारी राजेश अगरवाल राज्याच्या मुख्य सचिव पदी
राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश अगरवाल यांच्या नियुक्तीचे आदेश काल काढण्यात आले आहेत. राजेश अगरवाल यांच्या भारतीय प्रशासन सेवेतील कारकीर्दीला दापोली येथे सुरुवात झाली. २३ ऑगस्ट १९९१ ते ३१ जानेवारी १९९३ या कालावधीमध्ये त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी दापोली या पदावर काम केले होते. त्यामुळे त्यांच्या आठवणींना दापोली येथे उजाळा मिळाला आहे. सध्या ते केंद्र शासनामध्ये सचिव या पदावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. राज्य शासनाने त्यांची मुख्य सचिव या पदावर नियुक्ती केली असून १ डिसेंबरपासून ते या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.www.konkantoday.com




