चिपळूणच्या जनतेने नगर परिषदेची सत्ता द्यावी स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण करू ; प्रशांत यादव
चिपळूण (प्रतिनिधी) : शहराच्या विकासाला खो घालणारी ब्लु आणि रेड लाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तसेच नदीतील गाळ उपशासाठी लागणारा निधी त्वरित मिळवण्यासाठी निवडणुकीनंतर लगेच पाठपुरावा सुरू केला जाईल, तसेच चिपळूणच्या जनतेने शिवसेना भाजप युतीला आशीर्वाद दिले आणि नगरपरिषदेची सत्ता हाती दिली तर चिपळूण शहर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करून स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण करू असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांत यादव यांनी व्यक्त केला. चिपळूण शहरासाठी निधी कमी पडणार नाही, याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ असेही ते म्हणाले.
चिपळूण नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली असून नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहे.निवडणूक प्रभारी म्हणून प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध अशी प्रचार यंत्रणा राबवली जात असून पालकमंत्री उदय सामंत स्वतः लक्ष देऊन आहेत. पूर्ण निवडणूक प्रचार आणि शहर विकासासंदर्भात भाजप नेते प्रशांत यादव यांनी स्पष्टपणे युतीची भूमिका व शहरविकासाचे व्हिजन समोर ठेवले.
ते म्हणाले शहराला पूर्ण पुरमुक्त करायचे असेल तर नदीतील गाळ काढण्याची प्रक्रिया वेगवान करावी लागेल,आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की राज्यात सत्ता आपली आहे, तसेच पालकमंत्री देखील या विषयाकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे निवडणूकी नंतर लगेच या विषयाचा पाठपुरावा सुरू करू आणि गाळ काढण्यासाठी लागणारा अधिकचा निधी आणून गाळ उपसण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल तसेच ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
ब्लु आणि रेड लाईन बाबत प्रशांत यादव म्हणाले या विषयाबाबत यापूर्वीच सन्मा. मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी अत्यंत विस्तृतपणे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडला आहे आणि समाधानकारक बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात समिती स्थापन करून फेर सर्वेक्षण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे फक्त चिपळूणचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी ब्लु आणि रेड लाईनचा प्रश्न आहे तो निकाली निघेल आणि शहर विकासाचा मार्ग मोकळा होईल. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहरातील रस्त्यांचा व वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी तातडीने निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि मला विश्वास आहे, आम्ही जे उमेदवार दिले आहेत ते सर्व सर्वसामान्य जनतेमध्ये वावरणारे आहेत. त्यांना लोकांची जाण आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे असे आमचे सर्व उमेदवार आहेत. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील अगदी सर्वसामान्य जनतेमधला आहे. सतत जनतेमध्ये राहणारा असा कार्यकर्ता आम्ही नगराध्यक्ष पदासाठी दिला आहे. त्यामुळे शहरातील समस्या आणि त्याचा पुरेपूर अभ्यास त्यांच्याकडे असल्याने शहर विकासाला चालना देण्यास कोणतीच अडचण येणार नाही. असेही प्रशांत यादव म्हणाले.
चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणण्यात आम्ही कुठेच कमी पडणार नाही. याची खात्री मला आहे. राज्यात आणि केंद्रात देखील सत्ता आमची आहे, तसेच वरिष्ठ नेत्यांचे देखील चिपळूणकडे लक्ष आहे.केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आता गरज आहे ती चिपळूण नगरपालिकेत त्याच विचारांची सत्ता आणण्याची. चिपळूणच्या जनतेने त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, आम्ही सर्व मिळून एक नियोजनबद्ध असे काम करून दाखवू आणि चिपळूण शहराला पुन्हा नावारूपाला आणू असे ठामपणे ते म्हणाले.
विकासाची संकल्पना मांडताना प्रशांत यादव म्हणाले,जनतेला अपेक्षित असलेला विकास झाला पाहिजे. त्यासाठी शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन तसेच काही जाणकार अभ्यासू व्यक्ती या शहरात आहेत,त्यांना बरोबर घेऊन आणि गरज लागली तर काही तज्ञ लोकांची टीम साथीला घेऊन प्रयत्न केले जातील. जे काही आपण करणार आहोत ते शहरातील नागरिकांसाठी करणार आहोत. त्यामुळे त्यांना जे आवश्यक आहे.त्यांना जे हवे आहे. तेच केले पाहिजे.आणि त्यादृष्टिकोणातून आगामी काळात काम केले जाईल असे स्पष्टपणे ते म्हणाले.
नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाने सात कलमी कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार आमचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये शहरातील सर्व मूलभूत सुविधांचा समावेश आहे.शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने नागरी सुविधांमध्ये वाढ करावी लागणार आहे, तसेच महिलांची सुरक्षितता, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार, नगरपालिकेची इमारत, आरक्षित असलेले भूखंड विकसित करणे अशा अनेक विषयावर काम करण्याची गरज असून प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.