
किरण लोहार यांची राज्य साक्षरता केंद्र सल्लागार समितीत निवड
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे राज्य साक्षरता केंद्र सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत रत्नागिरी जिल्हा परिषद, प्राथमिक, माध्यमिक व योजना विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची निवड झाली आहे. या समितीत एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावर यांचे सह २५ सदस्यांचा समावेश आहे.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून जि. प. रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी जिल्हा विविध उपक्रमामध्ये राज्यात प्रथम येण्यासाठी सूक्ष्म नियोजन किरण लोहार यांनी केले. त्यांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील शिक्षण संस्था, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विविध संघटना याच्यातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com




