
कशेळी येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजन
गावखडी : राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री दत्त मंदिरामध्ये प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई कशेळी व स्थानिक भक्तगण यांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. ४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, सप्त देवतांची पूजा, होम हवन, गुरुचरित्र पारायण होईल. दुपार १२ वाजता महाप्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी ४ वाजता आनंदाबुवा होळकर यांचे श्रीदत्त जन्मावर कीर्तन, सायंकाळी ६ वाजता श्री दत्त जन्मोत्सव नंतर ओम ध्वनी आरती पालखी प्रदक्षिणा होईल. ५ डिसेंबर रोजी १२ वाजता माधुकरी प्रसाद, सायंकाळी ५ वाजता सत्यनारायणाची महापूजा, आरती, दर्शन होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम होईल.
श्री दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवाचा व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. तसेच दत्त जयंतीला महाप्रसादासाठी कोणाला देणगी द्यायची असेल तर रोख रक्कम स्वरूपात देण्यात यावी. आपली देणगी महाप्रसादाला वापरली जाईल, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.




