
आदर्श हायस्कूल, कुरतडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद तापेकर यांनी पटवून दिले खेळाचे महत्त्व
रत्नागिरी:
रत्नागिरी:
आदर्श हायस्कूल, कुरतडेच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच कुरतडे हायस्कूलच्या मैदानावर प्रचंड उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तीचे महत्त्व कळावे या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद तापेकर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते, तर कुरतडेचे उपसरपंच सुरज जाधव यांनी उद्घाटक म्हणून हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दाभोळकर सर यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. मांडवकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले आणि स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला.
प्रमुख पाहुणे आनंद तापेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या जीवनात खेळाचे असलेले अनमोल महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता व सांघिक भावना कशी वाढते, यावर त्यांनी जोर दिला. उद्घाटक सुरज जाधव यांनी या उपक्रमाकरिता आयोजकांना आणि सहभागी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मांडवकर सर, शिक्षकवृंद श्री. कांबळे सर, श्री. कदम सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. पवार सर, श्री. पालकर सर आणि वाय सिटी प्रमुख श्री. पालवकर सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हा संपूर्ण वार्षिक क्रीडा महोत्सव अत्यंत खेळीमेळीच्या आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.




