
आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींमध्ये धडक, ५ जण जखमी
आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर शिरगाव बसथांब्यानजीक गेल्या आठवड्यात सुरू झालेली अपघातांची मालिका अद्याप सुरू आहे. सलग दुसर्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ४ वा. २ दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले. एकाच ठिकाणी झालेला हा चौथा अपघात आहे.
यश पाटील (सोवेली), मनोज पवार (सडे), अक्षय मर्चडे (मंडणगड), प्रथमेश जाधव (बोरघर), मुराद अंतुले (पेवे) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर मंडणगड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे बहुतांश काम पूर्णत्वास गेल्याने वाहनांचा वेग कमालीचा वाढला आहे. आवश्यक ठिकाणी वाहनांची वेग मर्यादा मर्यादित ठेवण्यासाठी. गतिरोधक, दिशादर्शक, सूचना फलक याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे बसथां असलेल्या २० हून अधिक ठिकाणी वाहतूक धोकादायक झाली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होणार्या अपघातानंतर पढे येत आहे.
www.konkantoday.com




